पुणे : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरी नगरीमध्ये आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे राजकारण रंगले आहे.
जेजुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या वतीने जेजुरी नगरीत छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र आता चार वर्षांनंतरही शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला गेला नसल्याने शिवप्रेमींकडून पुतळा उभारण्याची जोरदार मागणी होत आहे.
जेजुरीत सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्ष राष्ट्रवादीमध्ये जुंपली असल्याचे चित्र आहे. जेजुरी नगरपरिषदेतील राष्ट्रवादीचे पक्षनेते जयदीप बारभाई यांनी मात्र सत्ताधाऱ्यांनी गेल्या चार वर्षात महाराजांचा पुतळा का उभारला नाही? असा संतप्त सवाल केला आहे.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जेजुरी नगरीत पुणे-पंढरपूर महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारुढ पुतळा लवकरात लवकर उभारावा, ही जेजुरीकरांची मागणी आहे.
महत्वाच्या घडामोडी-
‘राजकारणातली नवी आणीबाणी; संजय राऊतांची केंद्र सरकारवर टीका
“पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण”
शरद पवार यांच्या सूचनांबाबत मुख्यमंत्र्यांनी ठरवावं- देवेंद्र फडणवीस
“तीन पक्षाचं सरकार… सगळाच तीन तिघाडा आणि काम बिघाड”