सेक्स कोणासोबत करणार हे 24 तास आधी पोलिसांना कळवा; ‘त्या’ न्यायालयाचा अजब निर्णय

0
624

युरोप : सेक्स हा शब्द आपल्या कानावर पडला तरी माणूस लाजतो. किंवा सार्वजनिक ठिकाणी कुणी सेक्स हा शब्द उच्चारला तरी गुन्हा केल्यासारखे त्या व्यक्तीकडे पाहिले जाते. मात्र युरोपमध्ये  न्यायालयाने अजब निर्णय दिला आहे. सेक्स कुणासोबत करणार हे पोलिसांना 24 तास आधी सांगायला हवं, असा निर्णय न्यायालयानं घेतला आहे.

युनायटेड किंग्डममधील न्यायालयाने एका आरोपीला एक विचित्र अट घातली आहे. डीन डेअर असं या आरोपी व्यक्तीचं नाव आहे. लैंगिक शोषणाचा आरोप असणाऱ्या डीनला महिलांपासून दूर ठेवण्यासाठी एक विचित्र अट घालण्यात आली आहे. डीनला कोणत्याही महिलेसोबत संबंध ठेवण्याच्या 24 तास आधी त्यासंदर्भातील माहिती पोलिसांना द्यावी लागणार आहे.

डीन हा एक बांधकाम कामगार आहे. डीनने आत्तापर्यंत अनेक महिलांची छेड काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला शिक्षा म्हणून न्यायालयाने त्याच्यावर अनेक निर्बंध लादले आहेत. दैनंदिन कामासाठी आवश्यक असेल तरच महिलांशी संवाद साधावा, असं न्यायालयानं म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

रेणू शर्मा यांच्यानंतर आता धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातील वादही मिटण्याच्या मार्गावर

“हा राजकीय दहशतवाद आहे, तो संपवावाच लागेल”

सकाळी लवकर उठून काम करण्याची सवय आमच्या चुलत्यांमुळे लागली- अजित पवार

अंगात नुसतं विदर्भाचं रक्त असून चालणार नाही, प्रामाणिकही राहा; फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here