मुंबई : देवेंद्र फडणवीस साहेब सध्या अत्यंत अस्वस्थ आहेत. बेचैन आहेत. त्यांना सुरुवातीला स्वप्नं पडत होती सरकारमध्ये येण्याची, पण त्यांचा स्वप्नभंग झाला. त्यामुळे ते अशा प्रकारचं स्टेटमेंट करून जुन्या गोष्टी काढत राहतात, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे. ते बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
कोरोनाच्या काळात आमचं सरकार व्यवस्थित काम करत आहे. आमचं पोलीस खातं आहे, आमचे डॉक्टर्स आहेत. अशावेळी देवेंद्र फडणवीस यांनी जुन्या गोष्टी काढून वातावरण खराब करण्यापेक्षा अशा कोरोनाच्या स्थितीमध्ये सरकारच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केलं पाहिजे, असंही ते म्हणाले.
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचं सरकार अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहे. पाच वर्षं आमचं सरकार चालेल आणि पाच वर्षांनंतरही आम्ही तिन्ही पक्ष मिळून सरकार स्थापन करू, असा विश्वासही अनिल देशमुख यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
बॉलिवूडला आणखी एक मोठा धक्का; प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक सरोज खान काळाच्या पडद्याआड
चौथीची पोरगी पण सांगेल की ठाकरे सरकारचं काही खरं नाही; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारवर निशाणा
“जातो माघारी पंढरीनाथा; तुझे दर्शन झाले आता”