महाविकास आघाडीच्या नावाने राज्याला ब्लॅक फंगस मिळाला; प्रसाद लाड यांचा पलटवार

0
178

मुंबई : कोरोनाच्या काळात मुंबईतील चांगल्या कामाची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी या कामाचं विशेष कौतुक केलं. मात्र एवढं चांगलं काम केलं तरी विरोधक टीका करतात. त्याकडे शिवसैनिकांनी दुर्लक्ष करून कामावर लक्ष द्यावं, कारण विरोधक ब्लॅक फंगसप्रमाणे आहेत, असा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. यावर भाजप नेते प्रसाद लाड यांनी प्रतिक्रिया देत संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्राला मागच्या दीड वर्षापासूनच ब्लॅक फंगसची लागण झाली आहे. महाविकास आघाडीच्या नावाने राज्याला ब्लॅक फंगस मिळाला असल्याचा पलटवार प्रसाद लाड यांनी केला. तसंच बोलताना जरा भान ठेवून बोला, असा सल्लाही प्रसाद लाड यांनी संजय राऊतांना दिला.

महत्वाच्या घडामोडी –

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासोबत नाहीत हे आता सिद्ध होवू लागलंय- नवाब मलिक

“बोरूबहाद्दर म्हणतायत विरोधक ब्लॅक फंगस, म्हणून मुख्यमंत्री कायम कडी लावून घरी बसलेले असतात का?”

एवढं चांगलं काम केलं तरी टीका, विरोधक ब्लॅक फंगसप्रमाणे; संजय राऊतांचा हल्लाबोल

“नवाब मलिक प्रकरण गंभीर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी चाैकशी करा”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here