“बोरूबहाद्दर म्हणतायत विरोधक ब्लॅक फंगस, म्हणून मुख्यमंत्री कायम कडी लावून घरी बसलेले असतात का?”

0
238

मुंबई : कोरोनाच्या काळात मुंबईतील चांगल्या कामाची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी या कामाचं विशेष कौतुक केलं. मात्र एवढं चांगलं काम केलं तरी विरोधक टीका करतात. त्याकडे शिवसैनिकांनी दुर्लक्ष करून कामावर लक्ष द्यावं, कारण विरोधक ब्लॅक फंगसप्रमाणे आहेत, असा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया देत संजय राऊतांवर टीकास्त्र सोडलं आहे.

बोरूबहाद्दर म्हणतायत विरोधक ब्लॅक फंगस आहेत. अच्छा, म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कायम कडी लावून आणि दडी मरून घरी बसलेले असतात का? लोक लाजेपायी दौऱ्यावर गेले तरी धावतपळत जेवायला घरीच येतात का? काय निधड्या छातीचे सत्ताधारी मिळालेत महाराष्ट्राला…, असं ट्विट करत भातखळकरांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

एवढं चांगलं काम केलं तरी टीका, विरोधक ब्लॅक फंगसप्रमाणे; संजय राऊतांचा हल्लाबोल

“नवाब मलिक प्रकरण गंभीर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी चाैकशी करा”

पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या अहंकारामुळे देशाची स्मशानभूमी बनली- नाना पटोले

कोण रे बाबा तू सल्ला देणारा; निलेश राणेंचा रोहित पवारांवर हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here