सातारा : उद्योगधंदे बंद असल्याने लोकांमध्ये उद्रेक झाला तर तो कसा थांबवणार?, असा सवाल करत उदयनराजे यांनी राज्यातील लॉकडाऊन उठवण्याची मागणी केली आहे.
मृत्यू कोणाच्या हातात नाही. जो मरणार तो मरणार आणि जो जगणार तो जगणार. प्रत्येक मृत्यू हा कोरोनामुळेच होतो, असं नाही. जो जन्माला आला त्याला एक दिवस मरायचंच आहे. एखादाच माझ्यासारखा असतो ज्याला मरण नसतं, असं वक्तव्य भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी केलं आहे. ते साताऱ्यामध्ये बोलत होते.क
दरम्यान, कोरोनाबाबत आयुर्वेदिक उपचाराचा विचार शासनाने केला पाहिजे. याशिवाय गोवा राज्याप्रमाणे आपल्या राज्यातसुद्धा हॉटेल व्यवसाय सुरु झाले पाहिजेत, असं उदयनराजेंनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
चौथीची पोरगी पण सांगेल की ठाकरे सरकारचं काही खरं नाही; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारवर निशाणा
“जातो माघारी पंढरीनाथा; तुझे दर्शन झाले आता”
तिथं मॅप बदललेत, आपण अॅपवर बंदी घालतोय; जितेंद्र आव्हाडांचा केंद्र सरकारवर निशाणा