“मी मोदींना नेहमीच पत्रं लिहीत असतो, पण काहींना कांगावा करण्याची सवय आहे”

0
167

अकोला : देशाचं रूपांतर स्मशानभूमीत करणाऱ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदीला पत्र लिहण्याचे धाडस , विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करावे, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांवर निशाणा साधला होता. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया नाना पटोलेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

मी मोदींना नेहमीच पत्रं लिहीत असतो. महाराष्ट्राला आवश्यक ती मदत मोदींकडून मागत असतो आणि मोदींकडून ती मदत मिळतेही. महाराष्ट्राला सर्वाधिक व्हेंटिलेटर मोदींनी दिले. महाराष्ट्राला सर्वाधिक रेमडेसिवीर मोदींनी दिले. पण काहींना कांगावा करण्याची सवय आहे. अशा कांगावाखोरांना मी उत्तरे देत नाही, असं म्हणत फडणवीसांना पटोलेंना टोला लगावला आहे.

दरम्यान, फडणवीसांनी अकोलामध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यात ते बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

“अजितजदादा तुमच्या मनात बहुजनांविषयी आकस, आमचे हक्क म्हणजे सापशिडीचा खेळ वाटतो का?”

भाजप मराठा आरक्षणाच्या बाजूने आणि मराठा समाजाच्या सोबत- प्रवीण दरेकर

केंद्र सरकारने ऐन खरिपाच्या तोंडावर खतांचे भाव वाढवुन शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली- अमोल मिटकरी

कधी तरी ‘संजय’ बनून उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्र दाखवा; अतुल भातखळकरांचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here