“उंटाच्या तोंडाचा मुका घ्यायची धडपड करू नका, आम्ही चंपा बोललो तर तुमचं मानसिक संतुलन ढासळतं”

0
164

मुंबई : अजित पवार यांनी आता त्यांची झोप कमी करून पुण्यात लक्ष द्यायला हवं. पुणे जिल्ह्यात लक्ष घालायला त्यांना वेळ नसेल तर पुण्याचा पालकमंत्री बदलावा, असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला होता. यावर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया देत चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे.

चंद्रकांत पाटलांनी कुंभकर्णासारखं बरळु नये. आम्ही चंपा बोललो तर तुमचं मानसिक संतुलन ढासळतं. अजितदादा किती तास झोपतात आणि जागतात हे संपुर्ण राज्याला माहिती आहे. उगाच उंटाच्या तोंडाचा मुका घ्यायची धडपड करू नका, असं ट्विट करत अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटलांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

तुम्ही हे वाचलात का?

“नवाब मलिक सच्चे मुसलमान नाहीत, ते अल्लाहचे गुनाहगार आहेत”

महत्वाच्या घडामोडी –

…तर पुण्याचं पालकमंत्रीपद सोडा- चंद्रकांत पाटील

“राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार पुन्हा हाॅस्पिटलमध्ये”

“भाजपचे नेते रेमेडेसिविर इंजेक्शन विकत घेऊन सरकारला देणार होते, हे सपशेल खोटं”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here