कोल्हापूर : खालच्या पातळीवर जाऊन दुषणे देण्याची पद्धत बंद केली पाहिजे. यातूनच बिघडलेली राजकीय संस्कृती नीट करण्याची वेळ आली आहे,‘अन्यथा त्याचा काहीही शेवट होऊ शकतो. कोणी कोणाला धमकी देण्याची गरज नाही. कोणी कोणाला घाबरत नाही,” अशा म्हणत चंद्रकांत पाटील यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना उत्तर दिलं.
गोपीचंद पडळकर यांनी चुकीचे विधान केल्यानंतर पक्षाने त्यांना तात्काळ समज दिली होती. त्यांनी ती मान्यही केली होती. असे असताना पुन्हा शेरेबाजी सुरू करणे चुकीचे आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
याची सुरुवात कोणी केली, याच्या खोलात गेले तर आणखी कलगीतुरा होऊ शकतो. मात्र ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांच्या महाराष्ट्राच्या संस्कृतीत अशा पद्धतीची विधाने आणि राजकारण बसणारे नाही. त्यामुळे एकदाचा हा विषय संपला पाहिजे. अन्यथा हा विषय कोठेपर्यंत ही कुठेही भरकटू शकतो, असं ही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची फेरनिवड”
…अन्यथा राज्यात पुन्हा कडक लॉकडाउन करावा लागेल; मुख्यमंत्र्यांचा इशारा
30 जूननंतर लॉकडाउन उठणार का; उद्धव ठाकरेंनी दिलं ‘हे’ उत्तर
चंद्रकांत पाटील यांचं चंपा नाव कुणी ठेवलंय?; अनिल गोटेंनी सांगितलं ‘त्यांचं’ नाव