देवेंद्र फडणवीसांच मानसिक संतुलन बिघडलंय; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा फडणवीसांवर हल्लाबोल

0
143

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपानंतर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्री देशमुखांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती. त्यावरुन काँग्रेस प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय.

भाजपच्या 22 मंत्र्यांवर पुराव्यानिशी आरोप होते, कोणी राजीनामा दिला? केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या काळात पुलवामा हल्ला घडला, शाहांनी राजीनामा दिला का? भाजपच्या सर्व मंत्र्यांचे न्यायाधीश फडणवीस कसे झाले होते? भाजपने 2014 पासून त्यांच्या एकनाथ खडसे सोडून कोणत्या मंत्र्यावर आरोप झाल्यावर चौकशी लावली?” असा सवाल राजू वाघमारेंनी उपस्थित केला आहे.

15 फेब्रुवारीला प्रेस झाली परंतु हॉस्पिटलच्या परिसरात देशमुखांना डिस्चार्ज मिळाल्यावर! खोटे बोलून संभ्रम तयार करायचा! सत्ता गेल्यानंतर काही माणसांचे मानसिक संतुलन कसे बिघडते याचे उत्तम उदाहरण म्हणजे फडणवीस. भाजप नेते कृपा करून तपासून घ्या, असा टोला राजू वाघमारेंनी यावेळी लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

‘या’ कारणामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल”

देवेंद्र फडणवीसांच मानसिक संतुलन बिघडलंय; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा फडणवीसांवर हल्लाबोल

देशमुख क्वारंटाईनमध्ये होते, तर…; देवेंद्र फडणवीसांचा पवारांना सवाल

“मोठी बातमी! गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ‘या’ महिलेनं पोलिसात केली तक्रार दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here