पुणे : शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, अशी टीका भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर सडकून टीका केली आहे.
गोपीचंद पडळकर यांची ही टीका खालच्या पातळीवरील राजकारण आहे. यामुळे दुःख होतं आणि चीड देखील येते. शरद पवार यांच्या कामाचा जितका अनुभव आहे, तितकं टीका करणाऱ्यांचं वयही नाही, असा सणसणीत टोला रोहित पवार यांनी लगावला.
गोपीचंद पडळकर जे बोलले ते राजकीय वक्त्व्य होतं. त्यांना ज्यांनी आमदार बनवलं त्या भाजपच्या नेत्यानेच पडळकरांना हे चुकीचं असल्याचं सांगितलं. त्यांच्याच नेत्याला हे वक्तव्य चुकीचं वाटलं. त्यांच्याच नेत्याने ते चुकले हे दाखवून दिलं, असं रोहित पवार यांनी म्हटलं.
दरम्यान, ज्या लोकांना काही काम नाही तेच शरद पवार यांच्या बदनामीसाठी प्रयत्न करत आहेत, असंही रोहित पवार म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
“शरद पवारांवरील विधानानंतर पडळकरांविरोधात पहिला गुन्हा दाखल”
‘ही’ भाजपची परंपरा नाही; पडळकरांनी केलेल्या टीकेवर भातखळकरांच वक्तव्य
‘या’ दिवशी होणार मराठा आरक्षणावर सुनावणी; ठाकरे सरकारची भक्कम तयारी
पडळकरांच्या वक्तव्याचं मी समर्थन करत नाही पण…; निलेश राणेंचा राष्ट्रवादीला इशारा