Home महाराष्ट्र अशोक चव्हाण यांची हकालपट्टी करा; मराठा क्रांती ठोक मोर्चाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अशोक चव्हाण यांची हकालपट्टी करा; मराठा क्रांती ठोक मोर्चाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या निकालाची सुनावणी 7 जुलैला होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चा संघटनेचे मुख्य समन्वयक रमेश केरे यांनी मराठा आरक्षण उपसमितीची बैठक अद्यापही न झाल्याने उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

रमेश केरे यांनी याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाला एक पत्र पाठवलं आहे. यात त्यांनी म्हटलं आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत विनायक मेटे यांनी विचारलेल्या लक्षवेधी प्रश्नावर उत्तर दिलं होतं.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी मराठा आंदोलक उमेदवारांना सरकारी नोकरीमध्ये सामावून घेण्यासंदर्भात न्यायालयीन बाजू तपासून घेण्यासंदर्भात सर्वपक्षीय बैठक घेऊन निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं होतं. त्या आश्वासनामुळेच आझाद मैदानवरील आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले होते. मात्र, आजपर्यंत यावर कोणतीही बैठक अथवा निर्णय घेण्यात आलेला नाही, असं रमेश केरे म्हणाले.

“सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या निकालाची सुनावणी 7 जुलैला होणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने आपली बाजू कोर्टात मांडण्यासाठी काय तयारी केली? याची माहिती मराठा समाजाला मिळावी अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चा संघटनेनं केलीये. यासाठी मराठा आरक्षण उपसमितीची बैठक अद्यापही आयोजित करण्यात आलेली नाही. बैठकीचं आयोजन करण्यात येणार नसेल तर अशोक चव्हाण यांना उपसमितीच्या अध्यक्ष पदावरुन हटवा,” असंही रमेश केरे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

पुन्हा वेळ आणि शक्ती का वाया घालवायची? आदित्य ठाकरेंचा प्रकाश जावडेकरांना प्रश्न

…तर मी कोणतीही शिक्षा भोगायला तयार; हसन मुश्रिफ यांचं चंद्रकांत पाटलांना आव्हान

सामना’च्या अग्रलेखाला विखे पाटलांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

रोहित पवारांनी मराठी युवकांना दिला ‘हा’ मोलाचा सल्ला; म्हणाले…