मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळील खाण क्षेत्राच्या प्रस्तावित लिलावाच्या मुद्यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहिले आहे.
यापूर्वी दोन वेळा, एकदा 1999 आणि नंतर 2011 च्या दरम्यान, मूल्यमापन केल्यानंतर लिलाव रद्द करण्यात आला होता. मग यामुळे ताडोबा आणि अंधारीच्या वन्यजीव कॉरिडॉरचा नाश होणार आहे हे आपल्याला माहित असताना आपण या प्रक्रियेसाठी पुन्हा वेळ आणि शक्ती का वाया घालवायची?, असा प्रश्नही आदित्य ठाकरे यांनी या पत्रात विचारला आहे.
दरम्यान, जवळपास दहा वर्षांपूर्वी तत्कालीन केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी हा नाश थांबवला होता. त्यांनी या क्षेत्राचे सर्वेक्षण केले होते आणि खाण साइट योग्य नाही असे अहवालात सूचित केले होते. या भागाचे पुन्हा संरक्षण करावे, अशी विनंती आदित्य ठाकरे यांनी प्रकाश जावडेकर यांना केली.
यापूर्वी दोन वेळा, एकदा १९९९ आणि नंतर २०११ च्या दरम्यान, मूल्यमापन केल्यानंतर लिलाव रद्द करण्यात आला होता. मग यामुळे ताडोबा आणि अंधारीच्या वन्यजीव कॉरिडॉरचा नाश होणार आहे हे आपल्याला माहित असताना आपण या प्रक्रियेसाठी पुन्हा वेळ आणि शक्ती का वाया घालवायची?
— Aaditya Thackeray (@AUThackeray) June 22, 2020
महत्वाच्या घडामोडी-
…तर मी कोणतीही शिक्षा भोगायला तयार; हसन मुश्रिफ यांचं चंद्रकांत पाटलांना आव्हान
सामना’च्या अग्रलेखाला विखे पाटलांचं प्रत्युत्तर; म्हणाले…
रोहित पवारांनी मराठी युवकांना दिला ‘हा’ मोलाचा सल्ला; म्हणाले…
सर्वसामान्य नागरिकांची एकच मग धनंजय मुंडेंच्या दोन कोरोना चाचण्या का?; किरीट सोमय्यांचा सवाल