कोल्हापूर : शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून भाजपनं राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना खुलं आव्हान दिलं आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील एकही शेतकरी कर्जापासून वंचित असेल, तर शिक्षा भोगायला तयार आहे. असं आव्हानच मुश्रिफ यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिलं आहे.
आमदार चंद्रकांत पाटलांनी आंदोलनाच्या आधी पीक कर्ज वाटपाची कदाचित नीट माहिती घेतली नसावी. ज्या जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा जास्त कर्जवाटप झालं आहे. त्या जिल्हा बँकेविरोधातच भाजपा आंदोलन करत आहे. हा प्रकार हास्यास्पद असल्याचंही मुश्रीफ यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटलं आहे.
दरम्यान, राज्यभरात भाजपची आंदोलनं पार पडली. यामध्ये बँकांसमोर आंदोलनं करण्यात आली. मात्र कोल्हापुरात भाजपानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. यावरून भाजपची नामुष्की दिसून येते. असा टोलाही हसन मुश्रीफ यांनी लगावला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
सामना’च्या अग्रलेखाला विखे पाटलांचं प्रत्युत्तर; म्हणाले…
रोहित पवारांनी मराठी युवकांना दिला ‘हा’ मोलाचा सल्ला; म्हणाले…
सर्वसामान्य नागरिकांची एकच मग धनंजय मुंडेंच्या दोन कोरोना चाचण्या का?; किरीट सोमय्यांचा सवाल
तुमच्या मनातली भीती अशीच कायम राहिली पाहिजे; निलेश राणेंचा संजय राऊतांना टोला