Home महाराष्ट्र सर्वसामान्य नागरिकांची एकच मग धनंजय मुंडेंच्या दोन कोरोना चाचण्या का?; किरीट सोमय्यांचा...

सर्वसामान्य नागरिकांची एकच मग धनंजय मुंडेंच्या दोन कोरोना चाचण्या का?; किरीट सोमय्यांचा सवाल

मुंबई :  सर्वसामान्य नागरिकांची एकच कोरोना चाचणी करण्यात येते. तसा ठाकरे सरकारने आदेश काढला आहे. मग मंत्री धनंजय मुंडे यांच्या दोन कोरोना चाचण्या का? असा सवाल करत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

सर्वसामान्य नागरिकांची एक टेस्ट मग मंत्र्याच्या दोन टेस्ट का? हा दुजाभाव कशासाठी करायचा? कमीत कमी चाचण्या करण्याचं शासनाचे धोरण आहे. मात्र धनंजय मुंडे यांना मात्र वेगळी वागणूक देत पुन्हा त्यांची टेस्ट करण्यात आली, असं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात उत्तर द्यावं, अशी मागणी किरीट सोमय्यांनी केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

तुमच्या मनातली भीती अशीच कायम राहिली पाहिजे; निलेश राणेंचा संजय राऊतांना टोला

धनंजय मुंडेंची कोरोनावर मात; हात जोडून डॉक्टर, नर्ससह आरोग्य कर्मचाऱ्यांचे मानले आभार

शिवसैनिकांची पत्रं ‘प्रहार’मधून छापतो, मग बघू कशी कुरकुर होते; नितेश राणेंचा राऊतांना निशाणा

लातों के माफिया बातों से नाही मानते; सोनू निगमचा ‘या’ संगीतकारांना इशारा