Home महाराष्ट्र हे सरकार जातीयवादी तर आहेच मात्र…; प्रकाश आंबेडकरांची राज्य सरकारवर टीका

हे सरकार जातीयवादी तर आहेच मात्र…; प्रकाश आंबेडकरांची राज्य सरकारवर टीका

अकोला : राज्यात काही दिवसांत मागासवर्गीय, बौद्ध लोकांवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. या घटनांप्रकरणी जाब विचारण्यासाठी वंचितच्या वतीने आज सर्व जिल्हाधिकारी, प्रांत, तहसील, विभागीय अधिकारी यांना निवेदने देऊन या हल्ल्यांचा निषेध करण्यात आला.

राज्यात मागासवर्गीयांवरील हल्ल्यात प्रचंड वाढ झाली असून तपास यंत्रणा कुचकामी ठरल्या आहेत. कोणत्याही प्रकारची चौकशी होत नाही, कोणाला पकडले जात नाही, या सर्व प्रकारणांकडे दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप करत या झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी राज्यभर आंदोलने करण्यात येत आहे, असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

हे सरकार जातीयवादी तर आहेतच मात्र आता धर्मवादी दिसायला लागले आहे. शासनाकडून आमची अपेक्षा आहे की पोलिसांना योग्य तो आदेश देऊन या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करण्यात यावी, जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.

महत्वाच्या घडामोडी-

शिवसेनेचा त्याग खूप मोठा आहे; सुधीर मुनगंटीवारांचा शिवसेनेला टोला

जे काही झालं त्यासाठी करण जोहरवर आरोप करणं म्हणजे…;राम गोपाल वर्माचा करण जोहरला पाठिंबा

“कोरोनाविरुद्धच्या लढाईत जीवाची बाजी लावणाऱ्या पोलिसांसाठी अनिल देशमुखांनी ‘ही’ मोठी घोषणा”

“अखेर कोरोना रुग्णांचा जीव वाचवणारं पहिलं औषध सापडलं; WHO नं केलं ‘या’ देशाचं कौतुक”