खोदा पहाड, निकला चुहां; सुशांतसिंह प्रकरणावरून गुलाबराव पाटलांचा भाजपला टोला

0
218

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या सीबीआय चौकशीत काय झाले? खोदा पहाड, निकला चुहां, असं म्हणत शिवसेनेचे प्रवक्ते आणि पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

आम्ही सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात काहीही तथ्य नसल्याचे सुरुवातीपासूनच सांगत होतो. भाजपने या प्रकरणाचा राजकीय हेतू साध्य करण्यासाठी वापर केला. आता या प्रकरणाचे दूध का दूध आणि पाणी का पाणी झाले आहे, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी भाजपला टोला लगावला आहे.

महाराष्ट्राच्या पोलिसांना सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात बदनाम केले गेले. पोलिसांनी काहीच केले नसल्याच्या आरोप केला गेला. मात्र, सीबीआय चौकशीत गेल्या दीड महिन्यात काय झाले, असा प्रश्न गुलावराव पाटलांनी केला.

दरम्यान, भाजपकडून सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा वापर बिहारच्या राजकारणासाठी करण्यात आला, असंही गुलाबराव पाटलांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

अग्गंबाई सासूबाई मालिकेतील अभिनेत्री निवेदिता सराफ (बबड्याची आई) यांची कोरोनावर मात

सांगलीत अतिक्रमण हटविताणा महानगरपालिका अधिकाऱ्यांना धक्काबुक्की

“दिल्ली कॅपिटल्सचा राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरवर दणदणीत विजय”

दानवे किती रस्त्यावर असतात हे माहीत आहे; बाळासाहेब थोरातांचा दानवेंना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here