Home महाराष्ट्र समृद्ध जीवन मल्टिस्टेटमधील गुंतवणुकदारांचे पैसे परत घेण्यासाठी जनसंघर्ष समितीचा ३० रोजी आंदोलनाचा...

समृद्ध जीवन मल्टिस्टेटमधील गुंतवणुकदारांचे पैसे परत घेण्यासाठी जनसंघर्ष समितीचा ३० रोजी आंदोलनाचा इशारा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : समृद्धजीवन मल्टिस्टेट मल्टिपर्पज को. ऑपरेटिव्ह सोसायटीमधील गुंतवणुकदारांचे पैसे परत मिळण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (दि.३०) रोजी महाराष्ट्र राज्य जनसंघर्ष समितीच्या वतीने लिक्विडेटर कार्यालयासमोर गुंतवणूकदारांच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

समितीचे अध्यक्ष शाहुराज माने यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार असून यासंबंधी संघर्ष समितीने लिक्विडेटर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, समृद्ध जीवन मल्टिस्टेटमध्ये राज्यभरातील गुंतवणुकदारांनी करोडोंची गुंतवणूक केली आहे. परंतु कंपनीचे चेअरमन महेश मोतेवार यांनी या कंपनीत अनियमितता करत शासन व सर्व गुंतवणूकदारांची फसवणूक केली.

ही बातमी पण वाचा : कोल्हापुरात भाजपला मोठं खिंडार; हा मोठा नेता करणार पक्षाला रामराम?

सर्व मालमत्ता सील करत लिक्विडेशनमध्ये काढत जप्त केल्या. सर्व मालमत्ता शासनाच्या ताब्यात आहेत. यावर लिक्विडेटरची नेमणूक करण्यात आली आहे. २०१७ पासून आतापर्यंत आपल्या कार्यालयामार्फत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. सर्व मालमत्तांची विक्री करुन लिलावात काढत गुंतवणुकदारांना परतावा मिळणे गरजेचे आहे. त्यांना परतावा मिळाला नसल्याने अनेक कुटुंब रस्त्यावर आली आहेत. अनेकांनी आत्महत्या करुन जीवन संपविले. सर्वसामान्य गुंतवणुकदारांचा विचार करुन मालमत्ता लवकर विक्री कराव्या. सर्व गुंतवणुकदारांना त्यांचा व्याजासह परतावा द्यावा.

दरम्यान, गुंतवणुकदारांना व्याजासह परतावा मिळण्यासाठी सर्व गुंतवणुकदारांच्या वतीने ३० ऑगस्टला लिक्विडेटर यांच्या कार्यालयासमोर धरणे देण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत…; राज ठाकरेंच्या महाराष्ट्र सैनिकांना थेट सूचना

उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवर बोलत-बोलत…; एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट

भाजपला मोठा धक्का? ‘हा’ मोठा नेता करणार काँग्रेसमध्ये प्रवेश