आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
दिल्ली : नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील एनडीएच्या अनेक खासदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. महाराष्ट्रातून सर्वात अगोदर भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
ही बातमी पण वाचा : अजित पवारांना मोठा धक्का; केंद्रीय मंत्रिमंडळात एकही जागा नाही
नितीन गडकरी हे तीनवेळा नागपूरमधून निवडून आलेले आहेत. 2014, 2019 या मोदी सरकारमध्ये मंत्री होते. गडकरी हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष देखील राहिलेले आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रिपद नितीन गडकरी यांनी सांभाळलेलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील 6 खासदारांना संभाव्य मंत्रिपदाची जबाबदारी मिळत आहे. मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव, नितीन गडकरी, पीयूष गोयल, रामदास आठवले या 6 खासदारांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मोदी मंत्रिमंडळात कोण कोण सामील?; फायनल यादी आली समोर
शिंदे गटाचे अनेक पदाधिकारी आमच्या संपर्कात; ‘या’ काँग्रेस नेत्याचा गौप्यस्फोट
मोठी बातमी! गिरीश महाजन होणार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री?; दिल्लीत हालचालींना वेग