आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज माढ्यात सभा पार पडली. यावेळी त्यांनी माढ्यातील राजकीय घडामोडींबाबत अतिशय सूचक असं वक्तव्य केलं. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूंकप येण्याची शक्यता आहे.
“मोदी है तो मुमकिन है. आमचा प्रयत्न सर्वांना एकत्रित करण्याचा असतो, विभाजन करण्याचा नसतो. आता काय-काय होतं हे पुढे पाहा”, असं सूचक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
ही बातमी पण वाचा : वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस लवकरच…; प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान
“प्रत्येक टीकेला आम्ही कृतीतून उत्तर देतो. शेवटी लोकांना दिसतंय ना, ज्यावेळी शरद पवारांनी मोहिते पाटलांचं राजकारण जवळपास संपुष्टात आणलं होतं त्यावेळी आम्ही त्यांच्या पाठिशी उभे राहिलो होतो. त्यामुळे मला असं वाटतं की, त्यांच्याही घरात सगळ्यांना हे पटलंय, अशी परिस्थिती नाही. पण मी त्यावर जास्त काही बोलणार नाही. त्यांच्या पाठिशी आम्ही उभे राहिलो, आता त्यांना काय करायचं आहे, हा निर्णय त्यांना घ्यायचा आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
दरम्यान, माढ्यात निंबाळकर घराणं येत्या काळात एकत्र दिसणार का? असा प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीसांनी सूचक वक्तव्य केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘…म्हणून मी भाजपसोबत गेलो” ; अजित पवारांचा मोठा खुलासा
गोपाळकृष्ण शाळेत ‘एक पुस्तक आनंदाचे ‘ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन
“लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचा मोठा डाव; ‘हा’ बडा नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश”