लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वसंत मोरे यांनी मनसेला राम राम ठोकला. मोरे हे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छूक होते. मात्र मनसेनं त्यांना पुण्यातून लोकसभा निवडणुकीचं तिकीट नाकारलं.
ही बातमी पण वाचा : बलाढ्य चेन्नई सुपर किंग्सला नमवत दिल्ली कॅपिटल्सने नोंदवला पहिला विजय
वसंत मोरे मनसेतून बाहेर पडल्यानंतर ते राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र आता पुण्याच्या राजकारणामध्ये ट्वीस्ट निर्माण झाला आहे. वसंत मोरे यांना पुण्यातून वंचित बहुजन आघाडीनं तिकीट दिलं आहे. त्यामुळे वसंत मोरे आता वंचित बहुजन आघाडीचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आहेत.
दरम्यान, काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपमधून मुरलीधर मोहोळ यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. तर वंचित बहुजन आघाडीतून वसंत मोरे यांना तिकीट देण्यात आलं आहे. त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघातून तिहेरी लढत होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भाजपात गेलेल्या अशोक चव्हाण यांची काँग्रेसवर टीका,म्हणाले…
मनसे महायुतीत सहभागी होणार का?; ‘या’ बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य
भाजपला मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता ठाकरेंच्या वाटेवर?