मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोकणचा दौरा करणार आहेत. फडणवीसांच्या या दोन दिवसीय दौऱ्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ते येत आहेत तर चांगलं आहे, ज्ञानात भर पडेल, असं म्हणत फडणवीस यांच्यावर टीका केली होती. या टीकेला आता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
शरद पवार जे म्हणाले ते मी ऐकलं, मी विदर्भातील आहे त्यामुळे समुद्राची पाहणी करायला चाललो आहे असे ते म्हणाले, पण मी अनेकदा बारामतीत गेलो, तिथे मला समुद्र दिसला नाही, असं म्हणत, देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. कोकण दौऱ्यावर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
शरद पवार हे माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत. माझे वडिल असते तर त्याच वयाचे असते. त्यामुळे मुलगा किती पुढे गेला तरी बापाला असं वाटतं की त्याला कमी समजतं. त्या भावनेतून शरद पवार बोलले असतील, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
महत्वाच्या घडामोडी-
राष्ट्रवादीकडून राजू शेट्टींना आमदारकीची खुली ऑफर; तशी शरद पवारांचीच इच्छा
ते येत आहेत तर चांगलं आहे, ज्ञानात भर पडेल; कोकण दौऱ्यावरून शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांना चिमटा
ठाकरे सरकारच्या ‘या’ निर्णयाला देवेंद्र फडणवीसांचा पाठिंबा; म्हणाले…
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला चपराक दिली; देवेंद्र फडणवीसांची राज्यसरकारवर टीका