भारतीय संघाने 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी करून दाखवली. विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला भारताने धूळ चारून आज एक वर्ष झालं. या सामन्यात प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा, अशी एक गोष्ट कर्णधार विराट कोहलीने केली.
वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्या सामन्यात कर्णधार विराट कोहलीच्या एका कृतीने सर्वांचीच मनं जिकली. सामना सुरु असताना भारतीय प्रेक्षकांनी स्टीव्ह स्मिथची हुर्यो उडवली. हा प्रकार कर्णधार विराट कोहलीला आवडला नाही. त्याने थेट प्रेक्षकांना खडसावले. इतकंच नव्हे तर त्याने स्मिथसाठी टाळ्या वाजवा असं प्रेक्षकांना सांगितले आणि या प्रकारासाठी प्रेक्षकांच्या वतीने स्मिथची माफीदेखील मागितली.
दरम्यान, विश्वचषक स्पर्धेतील त्याच्या या कृत्याबद्दल ICC कडून कोहलीचा विशेष गौरवदेखील करण्यात आला.
पहा तो व्हिडिओ
#OnThisDay last year, Virat Kohli and Steve Smith shared this wonderful moment in #CWC19 #SpiritOfCricket pic.twitter.com/LImy8i7ncK
— ICC (@ICC) June 9, 2020
महत्वाच्या घडामोडी-
“पोलिसांसाठी आनंदाची बातमी; ४८ तासांत एकाही पोलिसाला कोरोनाची लागण नाही”
“मुख्यमंत्री केस कुठं कापतात, दाढी कुठं करतात हा प्रश्नच?;” भाजप आमदाराचा टोला
कोल्हापुरात शिवसेना, व्यापारी महासंघाकडून चीनच्या मालाची होळी
आम्हाला फक्त विदुषक हवाय; शरद पवारांचा राजनाथ सिंग यांना टोला