आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : गोखलेनगर येथील गोपाळकृष्ण प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत दिपावली सणाचे औचित्य साधून विविध ग्रिटींग कार्ड बनवणे,आकाशकंदील बनवणे, पणतीवर रंगकाम करणे, चित्ररंगभरण आदी उपक्रम घेण्यात आले होते. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी तयार केलेले साहित्य, विविध वस्तू यांचे प्रदर्शन प्रशालेत भरविण्यात आले होते. सदर प्रदर्शनाला पालकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.
ही बातमी पण वाचा : माझ्या केसाला जरी धक्का लागला तरी…; उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारला इशारा
प्रदर्शनाचे उद्घाटन सारथी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब पवार आणि नूतन माध्यमिक विद्यालय, केशवनगर या शाळेतील कलाशिक्षक सुनील जाधव, ताराचंद कचरे आदी मान्यवरांच्या यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी प्रदर्शनाला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गोखलेनगर शाखेचे शाखा व्यवस्थापक समीर भोसले, लिपिक हेमंत दुर्गाडे, कॅशीयर अरविंद शेंडकर यांनी भेट दिली. यावेळी मान्यवरांनी शाळेत होत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली गावडे यांनी केले. प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री कासार यांनी केले. विशाल चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन रणजित बोत्रे यांनी केले. यावेळी गीतांजली कांबळे मंदाकिनी बलकवडे व पालक उपस्थित होते.
महत्त्वाच्या घडामोडी –
अजित पवारांसोबत झालेली भेट ही…; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! शरद पवार आणि अजित पवार आले एकत्र; पुण्यात झाली भेट
लोकसभा निवडणुकीसाठी मनसेचा मेगा प्लॅन; राज ठाकरे घेणार विदर्भात सभा