पाकिस्तानच्या हल्ल्यात कोल्हापूरच्या आणखी एका सुपुत्राला वीरमरण; निगवे खालसा गावचे संग्राम पाटील शहीद

0
328

कोल्हापूर : भारतमातेने आज दि. 21 नोव्हेंबर पाकिस्तानच्या हल्ल्यात आपला आणखी एक सुपूत्र गमावला. कोल्हापूर जिल्ह्यातील निगवे खालसा याठिकाणचे संग्राम शिवाजी पाटील यांना पाकिस्तानच्या हल्ल्यात वीरमरण आलं. त्यामुळे निगवे खालसा गावासह परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातल्या निगवे खालसा या गावचे संग्राम पाटील हे राजौरी सेक्टर याठिकाणी कार्यरत होते. 16 मराठा अशोकचक्र बटालियनचे ते जवान होते. संग्राम पाटील हे भारतीय सैन्यात हवालदार पदावर कार्यरत होते. तसेच मे महिन्यात संग्राम हे रिटायर होऊन गावी परतणार होते.

दरम्यान, शहीद जवान हवालदार संग्राम पाटील यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

महत्वाच्या घडामोडी-

‘ही’ गोष्ट शिवसेनेच्या मुर्ख कार्यकर्त्यांना कधी समजणार?; ‘या’ काँग्रेस नेत्याची टीका

महाराष्ट्रात सरकार आहे की छळछावणी?- आशिष शेलार

2 कर्मचाऱ्यांना आधी कोरोनाची लागण; आता सलमान खानचा अहवाल आला समोर…

“भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याच्या वडीलांचे निधन”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here