नवी दिल्ली : शिवसेनेने सत्तेच्या हव्यासापोटी भाजपाला धोका दिला, असा आरोप केंद्रीय संरक्षण मंत्री आणि भाजपा नेते राजनाथ सिंग यांनी केला आहे. ते भाजपाच्या जनसंवाद कार्यक्रमात बोलत होते.
जेव्हा निवडणूक लढायची होती तेव्हा भाजपा आणि शिवसेनेची युती झाली. पण युती झाल्यानंतर सत्तेच्या हव्यासापोटी शिवसेनेने भाजपाला धोका दिला. मी भाजपाचं चारित्र्य स्पष्ट करु इच्छितो. आम्ही धोका खाऊ शकतो पण कधी देऊ शकत नाही. हेच भाजपाचं चारित्र्य आहे, असं राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस सुरु आहे. करोनाच्या संकटात जे काही महाराष्ट्रात सुरु आहे ते चांगलं नाही. शरद पवारांच्या हाती या सरकारची सूत्रं आहेत तरीही असं घडतं आहे ही बाब आश्चर्य वाटण्याजोगी आहे, असंही राजनाथ सिंग म्हणाले.
जब चुनाव लड़ना हुआ तो भाजपा और शिवसेना का गठबंधन हुआ।
लेकिन गठबंधन के बाद सत्ता की हवस में भाजपा को धोखा दिया गया।
मैं भाजपा के चरित्र को स्पष्ट करना चाहता हूं कि-
हम धोखा खा सकते हैं, लेकिन धोखा कभी दे नहीं सकते हैं।
यह भाजपा का चरित्र है: श्री @rajnathsingh #BJPJanSamvad pic.twitter.com/TYVS57Wuj7
— BJP (@BJP4India) June 8, 2020
महत्वाच्या घडामोडी-
“कोरोना संसर्गाबाबत चीनचा मोठा खुलासा”
महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस सुरु आहे; राजनाथ सिंग यांची राज्य सरकारवर टीका
लॉकडाऊनच्या एक्झिट प्लॅनचं राज्य सरकारकडे कसलंच नियोजन आणि धोरण नाही- राजू पाटील
“शरद पवार उद्यापासून दोन दिवस कोकण दौऱ्यावर”