आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
अमरावती : शेतकरी आणि मजुरांच्या विविध प्रश्नांवरून प्रहार जनशक्ती संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी अमरावती येथे ‘जन एल्गार मोर्चा’ची हाक दिली आहे.
मजुरांच्या प्रश्नांवर पुढील 15 दिवसांत तोडगा काढा, अथवा मंत्रालयात साप सोडू, असं विधान बच्चू कडू यांनी केलं.
ही बातमी पण वाचा : शरद पवारांमध्ये, पंतप्रधान होण्याची क्षमता, मात्र…; पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठं विधान
शेतकऱ्याला साप चावला तर त्यांच्यासाठी विमा आहे. पण मजुराला साप चावला तर त्याला पैसे मिळत नाहीत. यावर आम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांनी पैसे देण्यास होकार दर्शवला. पण मंत्र्यालयातील कृषी सचिव ढवळे याला आडवा येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही कृषी सचिवाला इशारा देतोय की, त्यांनी पंधरा दिवसांत यावर तोडगा काढावा. अन्यथा आम्ही मंत्रालयातील सचिव कार्यालयात साप सोडल्याशिवाय राहणार नाही., असा इशारा बच्चू कडूंनी यावेली दिला.
दरम्यान, सापाला काही जात, धर्म किंवा पंथ नसतो. एका गावात मजुराला साप चावला तर पैसे मिळणार आणि दुसऱ्या गावात मजुराला साप चावला तर पैसे मिळणार नाहीत, हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. शेतात राब-राब राबणाऱ्या मजुराला मदत झालीच पाहिजे, असंही बच्चू कडू म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
प्रियंका चतुर्वेदींचा नारायण राणेंवर जोरदार हल्लाबोल; म्हणाल्या,’नारायण राणेंना त्यांची…’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं एनडीएच्या बैठकीत मोठं वक्तव्य; म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी आमच्यासोबत…