आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष जोरदार निशाणा साधला.
एकनाथ शिंदे यांनी यावेळी 50 खोक्यांच्या टीकेचा मुद्दा उपस्थित करत ठाकरेंवर निशाणा साधला. शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह आपल्याला मिळाल्यानंतर आपण उद्धव ठाकरे यांच्या गटाला 50 कोटी रुपये दिले, असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.
ही बातमी पण वाचा : भाजपाच्या बड्या नेत्याचं खळबळजनक वक्तव्य, म्हणाले..“माझा जीव जाता जाता वाचला”
आमच्या 50 आमदारांना तुम्ही वारंवार हिणवत आहात. खोके आणि गद्दार हे दोनच शब्द आहेत. खोके आणि गद्दार यांचादेखील सोक्षमोक्ष लावला पाहिजे. खरं म्हणजे या महाराष्ट्राचा महागद्दार कोण आहे? हेही बघायला पाहिजे म्हणून मी आपल्याला सांगतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले. अध्यक्ष महोदय, ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली, ज्यांनी महाराष्ट्राच्या मतदारांशी गद्दारी केली, बेईमानी केली, 25 वर्षाच्या जुन्या मित्राशी बेईमानी केली आणि ज्यांनी शिवसैनिकांशी गद्दारी केली आणि आपल्या परिवारांशी केली ते कोण? मला या सगळ्या गोष्टी बोलायला आवडत नाही. पण कुणी बेईमानी केली? कुणी विश्वासघात केला? अरे आम्ही तर ज्यांच्याबरोबर युतीमध्ये निवडून आलो, त्यांच्याबरोबर युती करुन आम्ही सरकार स्थापन केलं”, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप होणार? काँग्रेस फुटणार? ; देवेंद्र फडणवीसांच सूचक विधान
नितीन देसाईंच्या आत्महत्येवर, मनसेच्या ‘या’ नेत्याचा धक्कादायक दावा, म्हणाला…
नितीन देसाईंच्या आत्महत्येबाबत, त्यांच्या बाॅडीगार्डने केला मोठा खुलासा, म्हणाला…