105 जागा मिळूनही महाराष्ट्रात भाजपाची सत्ता का नाही?; यावर शरद पवार म्हणाले…

0
180

मुंबई : भाजपाचं म्हणणं आहे की आमच्या 105 जागा आल्या. मात्र त्या जागा त्यांना शिवसेनेच्या जोरावर मिळाल्या आहेत. ज्या शिवसेनेला ते विसरुन गेले. त्याचमुळे त्यांची सत्ता आली नाही असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांन व्यक्त केलं आहे.

प्रमुख पक्ष प्रमुख कसा बनला याच्याही खोलात गेलं पाहिजे. भाजपाच्या ज्या 105 जागा निवडून आल्या त्या जागांमागे शिवसेनेचं योगदान मोठं होतं. मात्र या योगदानाचा भाजपाला विसर पडला. तुम्ही शिवसेनेला बाजूला काढलंत. शिवसेना भाजपाच्या सोबत नसती तर 105 ची संख्या कुठेतरी 40-50 च्या आसपास असती, असं शरद पवार म्हणाले.

गेली काही वर्षे जो ट्रेंड बघायला मिळाला तोच ट्रेंड जर शिवसेना नसती तर भाजपाच्या जागांबद्दल बघायला मिळाला असता. त्यामुळे 105 जागांबाबत जे भाजपाचे नेते सांगतात की आम्हाला सहकाऱ्यांनी दुर्लक्षित केलं. मात्र 105 या संख्येपर्यंत भाजपा ज्यांच्यामुळे पोहचली त्यांनाच गृहित धरलं गेलं, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान संजय राऊत यांनी शरदपवारांच्या घेतलेल्या मुलाखतीचा आज पहिला भाग पार पडला. या भागात संजय राऊत यांनी 105 आमदार असूनही भाजपाची सत्ता का आली नाही? हा प्रश्न विचारला. त्यावर शरद पवारांनी हे उत्तर दिलं.

महत्वाच्या घडामोडी-

…म्हणून ‘मी पुन्हा येईन’ ही घोषणा चेष्टेचा विषय झाला- शरद पवार

“मुख्यमंत्र्यांचं ‘हे’ काम पाहून देवेंद्र फडणवीसांचे डोळे पांढरे होतील”

मराठा आरक्षण कायम ठेवण्यासाठी राज्य सरकारची भक्कम तयारी- अशोक चव्हाण

एक शरद आणि शिवसेनेचे सगळे गारद; नारायण राणेंचा शिवसेनेला टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here