आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेच्या महिला नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं होतं.
शिवसेनेतील बंडखोरीनंतर तब्बल 1 वर्षांनी, नीलम गोऱ्हे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवय्या उंचावल्या गेल्या. तसेच त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात जाण्याचा निर्णय का घेतला, असा सवालही त्यांनी विचारला गेला. त्यावर आता नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ही बातमी पण वाचा : …तर अजित पवार नक्कीच मुख्यमंत्री होतील; भाजप खासदाराचं मोठं विधान
“निवडणूक आयोगाने बाळासाहेब ठाकरेंची मूळ शिवसेना पक्ष म्हणून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील पक्षालाच मान्यता दिली आहे. त्यामुळेच धनुष्यबाण एकनाथ शिंदेंकडे आहे. जेव्हा एकनाथ शिंदे गेले, गुवाहाटीवरून परत आले, मुख्यमंत्री झाले त्यावेळी वाटत होतं की हा विषय तात्पुरत्या स्वरुपाच्या मंत्रीपदाचा असावा. त्यावेळी पक्षातून 63 पैकी 40 एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदार सोडून गेले., असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
दरम्यान, त्यानंतर पक्षात संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने काही बदल होतील, त्यांच्या काय अपेक्षा आहेत हे समजून घेतलं जाईल, असं वाटलं. मात्र, तसं झालं नाही. एक वर्षानंतर अनेक जिल्ह्यांमधील लोकांशी माझं बोलणं झालं. उद्धव ठाकरे दौरे करत नसले, तरी मी काही ठिकाणी जाऊन आले होते. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की पक्षाच्या कार्यकर्त्यांचं नीतीधैर्य खचत चाललं आहे. याला कारण म्हणजे रोज सकाळी होणारा वादविवाद. एवढा एकच कार्यक्रम, असा आरोपही नीलम गोऱ्हेंनी यावेळी केला.
महत्त्वाच्या घडामोडी –
राष्ट्रवादीनंतर आता लवकरच काँग्रेस आमदारांचा नंबर….; रोहित पवारांचं धक्कादायक विधान
“मोठी बातमी! राष्ट्रवादीची विस्कटलेली घडी पुन्हा बसणार?; काका-पुतण्या एकत्र येणार?”
मिठाचा खडा टाकणारे शकुनी कोण? ; अमोल कोल्हेंचा नेमका रोष कोणावर