…अन्यथा आपल्या विधानाला कोणताही अर्थ उरणार नाही; अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

0
294

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस, डॉक्टर आपला जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करत आहे. मात्र अनेकांप्रमाणे आरोग्य कर्मचारी, पोलीस यांच्या मानधनात कपात केल्याची माहिती मिळत आहे. यावरुन मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहलं आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनीक आरोग्य विभाग तसचं आरोग्य सेवा अयुक्तालय यांनी 20 मे रोजी काढलेल्या आदेशानुसार वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मासिक मानधनात कपात करण्यात आली आहे. डॉक्टरांच्या मानधनातील ही कपात अन्यायकारक असून या आदेशामुळे तरुण डॉक्टरांच्या मनात असंतोषाचे वातावरण निर्माण झालं आहे, असं अमित ठाकरे यांनी पत्रात नमुद केलं आहे.

दरम्यान, माझी आपल्याकडे अग्रहाची मागणी आहे. की वैद्यकीय अधिकारी आणि नर्सेस यांना त्यांचे पूर्वीचेच वेतन देण्याबाबत आपण त्वरीत कार्यवाही करावी, अन्यथा कोरोनाविरोधात लढणारे डॉक्टर्स आणि नर्सेस हे योद्धे आहेत या आपल्या विधानाला कोणताही अर्थ उरणार नाही, असंही अमित ठाकरे म्हणाले.

https://www.facebook.com/amitthackerayofficial/posts/1167039006983783

महत्वाच्या घडामोडी-

… तरीही भाजप नेत्यांना फक्त राज्यपालच दिसतात; बाळासाहेब थोरातांच भाजपवर टीकास्त्र

तुम्ही जर मुख्यमंत्री असता, तर आमच्यावर ही वेळच आलीच नसती; पोलिसाने फडणवीसांसमोर मांडली व्यथा

“शरद पवारांनी पंतप्रधानांऐवजी एखादं पत्र मुख्यमंत्र्यांनाही लिहावं”

…तर मग हा देश ड्रामा करणाऱ्यांचा आहे; जितेंद्र आव्हडांच निर्मला सीतारमन यांच्यावर टीकास्त्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here