आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नाशिक : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाचा व्हीप नाकरल्यावरून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र केले होते.
मात्र हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर कोर्टाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवला आहे. तसेच लवकरात लवकर हा निर्णय घेण्यात यावा असेही कोर्टाने म्हटले आहे. त्यानुसार आता राहुल नार्वेकर यांनी 16 आमदारांच्या अपात्रते प्रकरणी दोन्ही शिवसेनेची घटना तपासणी करणार असल्याचे म्हटलं आहे. यावरून नरहरी झिरवाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ही बातमी पण वाचा : भाजपला घराचा आहेत; आपल्याच सरकारच्या विरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक
सुप्रीम कोर्टाने ज्या 10-12 बाबी सांगितल्या आहेत त्या सगळ्याच विरुद्ध आहेत. फक्त, एकच बाब आहे ती अध्यक्षांना तपासायला दिली आहे. त्यामुळे आता तपासणी पलीकडे काही मार्ग नाही. कितीही दिवस तपास केला तरी तो ठरलेलाच आहे. पण, तपास हा तपासच असतो. तो कधीपर्यंत चालेल याची खात्री नाही, असा टोला झिरवाळ यांनी यावेळी लगावला.
दरम्यान, हा तपास किती दिवसात पूर्ण होणार आणि लवकर म्हणजे किती ते मी काही सांगू शकत नाही. कारण, लवकर म्हणजे आजही होऊ शकतो, तीन दिवसात होऊ शकतो किंवा सहा महिने झाले तरी लवकरच म्हणावे लागेल, असंही झिरवाळ म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
राष्ट्रवादीला मोठा धक्का: गोंदियाच्या नगराध्यक्षांसह 15 नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश
‘पाटील’ आडनावावरून उठलेल्या वादावर, आता गाैतमीनं पहिल्यांदाच सोडलं माैन, म्हणाली…
उपमुख्यमंत्री फेकण्यात तज्ज्ञ आहेत; नाना पटोलेंची टीका