मुंबई : निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यातून मुंबईसह महाराष्ट्राचे रक्षण करणाऱ्या सगळ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानले.
महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट घोंघावत असतानाच चक्रीवादळाचा तडाखा बसला. संकट म्हटले तर मोठे होते, पण हे संकट आपण सगळ्यांनी परतावून लावले आहे. जनता व प्रशासनाने झुंज दिली व संकटाची तीव्रता कमी केली. दुर्दैवाने अपघातात दोन जीव गेले. कोकणात तसेच इतरत्र नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिले आहेत.
मुंबा देवीचीच कृपा मुंबई वर आहे. तशी पंढरपूर विठू माऊलींचे आशीर्वाद आहेत. मुख्य म्हणजे या वादळाला थोपवून सामना करणारे महापालिका अधिकारी, जिल्हा प्रशासन, आपत्कालीन व्यवस्थापन, वैद्यकीय पथके या सगळ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. वृत्तवाहिन्या सुद्धा लोकांना चांगली माहिती देत होत्या, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यातून मुंबईसह महाराष्ट्राचे रक्षण करणाऱ्या सगळ्यांचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आभार मानले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे निवेदन:#CycloneNisarga pic.twitter.com/Pyq68YimPk
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 3, 2020
महत्वाच्या घडामोडी-
‘महाराष्ट्रा काळजी घे’ ; मनसेचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
आम्ही तुमच्या पाठिशी आहोत; अरविंद केजरीवालांचं उद्धव ठाकरेंना टि्वट
अर्शद वारसीने केलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचं कौतुक; म्हणाला…
वादळाचा जोर ओसरेपर्यंत बाहेर पडण्याचा प्रयत्न करू नका; अजित पवार यांचं जनतेला आवाहन