आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले असून काँग्रेसनं एकहाती सत्ता मिळवली आहे. कर्नाटकात काँग्रेसला 135 जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला पराभवाचा धक्का बसला. यावरून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
कर्नाटकातील विजय हे काँग्रेसचं यश असून, आमचं कोणीच वाकडं करू शकत नाही, असं समजणाऱ्या प्रवृत्तीचा पराभव आहे, असं राज ठाकरेंनी म्हटलं. ते माध्यमांशी बोलत होते.
ही बातमी पण वाचा : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसला दिलेला कौल हा..; अजित पवारांचा भाजपवर हल्लाबोल
मागे एकदा माझ्या भाषणात म्हटलं होतं की, विरोधी पक्ष कधी जिंकत नाही. सत्ताधारी हरत असतात. हा स्वभावाचा आणि वागणुकीचा पराभव आहे. आमचं कोणीच वाकडं करू शकत नाही, असं समजणाऱ्या प्रवृत्तीचा पराभव आहे. जनतेचा कधीही गृहित धरू नका, हा त्यातील बोध आहे. सर्वांनीच त्यातून बोध घ्यावा, असा टोला राज ठाकरेंनी यावेळी म्हटलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
“मोठी बातमी! पराभवानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी दिला राजीनामा”
कर्नाटकात भाजपचं गणित कुठं चुकलं? देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं कारण, म्हणाले…
“सांगलीतील दंडोबा डोंगराच्या पूर्व भागात जोरदार पाऊस, लिंबूंच्या आकाराच्या गारा कोसळल्या”