Home महाराष्ट्र ही आहे राज ठाकरेंची पॉवर; ज्याने ललकारलं, आता तोच नेता म्हणतोय राज...

ही आहे राज ठाकरेंची पॉवर; ज्याने ललकारलं, आता तोच नेता म्हणतोय राज ठाकरेंचं अयोध्येत स्वागत करू

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अयोध्या : उत्तर भारतीयांबाबत राज ठाकरेंनी केलेल्या विधानांबद्दल जाहीर माफी मागितल्याशिवाय त्यांना अयोध्येत प्रवेश करू देणार नाही,असा इशारा देत काही महिन्यांपूर्वी भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला होता.

बृजभूषण सिंह यांच्या इशाऱ्यानंतर राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा रद्द केला होता. यावर ‘राज ठाकरे दबंग नहीं, चूहा है, अपने बिल में रहता है’, असे डिवचणारे विधान बृजभूषण शरण सिंह यांनी केले होते. त्यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. आता तेच बृजभूषण सिंह बॅकफूटवर आले आहे.

ही बातमी पण वाचा : ठाकरेंनंतर आता पवारांना मोठा धक्का, घड्याळाबाबत, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

राज ठाकरेंशी माझे काही वैयक्तिक भांडण नाही. त्यावेळी मी उत्तर भारतीयांच्या मुद्द्यावर म्हणालो होतो की त्यांनी माफी मागावी आणि मग अयोध्येला यावे. पण त्यांनी इथे न येऊन एक प्रकारे आमचा सन्मान केला आहे. त्यामुळे मोठा वाद टळला. आता मला वाटतं की ते जर आले तर मला कोणताही आक्षेप नाही. कुणालाच कोणता आक्षेप नाही, असं बृजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे.

तेव्हा वाद टाळून त्यांनी उत्तर भारतीयांचा एक प्रकारे सन्मान केला. ते जरी स्वत:च्या तोंडून खेद व्यक्त करू शकले नाहीत किंवा दिलगिरी व्यक्त करू शकले नाहीत तरी अयोध्येला न येणे हा सुद्धा एक प्रकारे उत्तर भारतीयांचा सन्मानच आहे. आता मला राज ठाकरेंच्या बाबतीत काहीही बोलायचे नाही, असं बृजभूषण सिंह यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, जशी अयोध्या आमची आहे, तशीच ती राज ठाकरे यांची सुद्धा आहे. त्यांनी इकडे यावे, त्यांचे स्वागतच आहे, असंही बृजभूषण सिंह म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी 

“ठाण्यातील शिवसेनेच्या बालेकिल्यातील ‘हा’ मोठा नेता उद्धव ठाकरेंच्या भेटीला, चर्चांना उधाण”

ठाकरे गट-शिंदे गट एकत्र येणार?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

शरद पवार त्यांच्या नावाप्रमाणे पावरफूल नेते आहेत – चंद्रकांत पाटील