आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गट-शिंदे गट एकत्र येणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सूरू होत्या. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल अयोध्या दौऱ्यावर जात असताना काही पत्रकारांनी तर त्यांना थेट याबाबतचा प्रश्न विचारला. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे.
दोन्ही गट एकत्र येणार का? असा सवाल केला असता सध्या तरी तशी काहीच शक्यता नाही., असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी या युतीच्या चर्चांना पूर्णविराम दिला.
ही बातमी पण वाचा : शरद पवार त्यांच्या नावाप्रमाणे पावरफूल नेते आहेत – चंद्रकांत पाटील
दरम्यान, आम्ही हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जात आहोत. बाळासाहेब ठाकरे यांची तीच विचारधारा होती. पण त्यांच्या विचारांची तोडमोड करून त्यांनी सरकार बनवलं. आम्ही तसे नाही. आम्ही भाजप सोबत नैसर्गिक युती केली आहे, असं सांगतानाच पूर्वी लोकांना हिंदू आहे सांगायलाही भीती वाटत होती. 2014 मध्ये मोदींचं सरकार आलं आणि हिंदुत्वाला प्रतिष्ठा प्राप्त झाली, असंही शिंदे म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी
एकनाथ शिंदेंनी, दोनदा शिवसेना सोडली, मात्र त्यावेळी त्यांना…; ‘या’ नेत्याचा मोठा गाैफ्यस्फोट
उध्दव ठाकरेंमुळे राज ठाकरेंना भेटता येत नव्हतं; एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट