आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
कोलकाता : आयपीएलचा 16 व्या हंगामाला सूरूवात झाली असून आज आयपीएलचा 9 वा सामना आज राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोल यांच्यात खेळला गेला. या सामन्यात कोलकाताना बेंगलोरचा 82 धावांनी पराभव केला.
या सामन्यात बेंगलोरचा कर्णधार फाफ ड्यू प्लेसिसने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 विकेट गमावत 204 धावा केल्या. कोलकाताकडून शार्दुल ठाकूरने 29 चेंडूत 68 धावांची विस्फोटक खेळी केली. या खेळीत 9 चाैकार, 3 षटकारांचा समावेश होता. तर रहमानुल्लाह गुरबाजने 44 चेंडूत 57 धावा केल्या, तर रिंगु सिंगने 33 चेंडूत 46 धावा केल्या. तर बेंगलोरकडून डेव्हिड विली व कर्ण शर्माने 2, तर हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, मायकल ब्रेसवेलने 1 विकेट घेतली.
ही बातमी पण वाचा : “आपलं हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी, ठाकरेंकडून महिलांचा ढाल म्हणून वापर”
दरम्यान, धावांचा पाठलाग करताना बेंगलोरचा संघ केवळ 17.4 षटकात केवळ 123 धावांतच आटोपला. बेंगलोरकडून कर्णधार फाफ ड्यू प्लेसिसने 12 चेंडूत 23 धावा, विराट कोहलीने 18 चेंडूत 21 धावा, डेव्हिड विलीने 20 चेंडूत 20 धावा, मायकल ब्रेसवेल 18 चेंडूत 19 धावा, आकाशदीपने 8 चेंडूत 17 धावा केल्या. तर बाकी खेळाडूंना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. तर कोलकाताकडून वरूण चक्रवर्तीने 4, सुयश शर्माने 3, सुनील नारायणने 2, तर शार्दुल ठाकूरने 1 विकेट घेतली.
महत्त्वाच्या घडामोडी
“कोरोना पुन्हा फैलावतोय, सांगली कारागृहात कोरोनाची एंट्री, प्रशासन अलर्टवर”
काँग्रेसला अंतर्गत वादाचा फटका; ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर