काहीच न मिळाल्याने चित्रा वाघ यांचं मानसिक संतुलन ढासळलं आहे- रुपाली चाकणकर

0
1659

पुणे :  हो आहोतच बावळट, म्हणूनच पक्षाशी आणि आदरणीय साहेबांशी प्रामाणिक राहिलो. भाजप सत्तेत येईल आणि काहीतरी हाताला लागेल म्हणून तिकडे गेल्य. पण काहीच न मिळाल्याने मानसिक संतुलन ढासळले आहे म्हणून त्या अशा बोलत आहेत, असं म्हणत राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यावर टिकास्त्र सोडलं आहे.

आम्हाला पीडितेचा जीव वाचविणे महत्त्वाचे आहे, त्यामुळे त्या काय बोलतात याकडे लक्ष द्यावे असं मला वाटत नाही. संपूर्ण महाराष्ट्र पीडित युवतीला या दुर्घटनेतून सावरण्यासाठी प्रार्थना करतोय, आम्हीही प्रयत्न करतोय आणि या तिथे येऊन राजकारण करतात. त्यापेक्षा त्यांनीही मुलीसाठी प्रार्थना करावी, असंही रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत.

दरम्यान, हिंगणघाट प्रकरणावरुन रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांच्यावर बोचरी टीका केली होती. यावर उत्तर देताना वाघ यांनी चाकणकर ही बाई बावळट आहे, अशी कडवट टीका केली होती. यावर चाकणकर यांनी पुन्हा प्रत्युत्तर दिलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

सतत लोकांना सल्ले देणाऱ्या चंद्रकांत पाटलांना आमचा प्रेमाचा सल्ला- काँग्रेसचा पलटवार

“महिलांवरील अत्याचार सुसंस्कृत महाराष्ट्रात सहन केले जाणार नाहीत”

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेसंदर्भात अमोल कोल्हेंनी दिलं स्पष्टीकरण; म्हणतात…

लाज वाटायला हवी तुम्हाला; अभिनेते प्रकाश राज भाजपवर कडाडले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here