आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नवी दिल्ली : आयपीएलचा 16 व्या हंगामाला सूरूवात झाली असून आज आयपीएलचा 7 वा सामना आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात गुजरातने दिल्लीचा 6 विकेट्सने पराभव केला.
या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने टाॅस जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 विकेट गमावत केवळ 162 धावा केल्या. दिल्लीकडून कर्णधार डेव्हिड वाॅर्नरने सर्वाधिक 32 चेंडूत 37 धावा केल्या. तर अक्षर पटेलने 22 चेंडूत 36 धावांची वेगवान खेळी केली. तर गुजरातकडून मोहम्मद शमी व राशीद खानने 3, तर अल्जारी जोसेफने 2 विकेट्स घेतल्या.
ही बातमी पण वाचा : …तर मी शिवसेना सोडून, काँग्रेसमध्ये काम करेन; ‘या’ आमदाराचं थेट राहुल गांधींना आवाहन
दरम्यान धावसंख्येचा पाठलाग करताना गुजरातने हे लक्ष्य 18.1 षटकात 4 विकेट गमावत सहज पूर्ण केलं. गुजरातकडून साई सुदर्शनने सर्वाधिक 48 चेंडूत नाबाद 62 धावांची खेळी करत विजयात मोलाची भूमिका बजावली. तर विजय शंकर 23 चेंडूत 29, तर डेेव्हिड मिलरने 16 चेंडूत नाबाद 31 धावा करत गुजरातला विजय मिळवून दिला. तर दिल्लीकडून नाॅर्खियाने 2, तर खलील अहमद, व मिशेल मार्शने 1 विकेट घेतली.
महत्त्वाच्या घडामोडी
माझ्या संयमाचा अंत बघू नका, मी जर तोंड उघडलं तर…; फडणवीसांचा, ठाकरेंना इशारा
“ठाकरेंना मोठा धक्का; ठाण्यात मारहाण करण्यात आलेल्या ‘त्या’ महिलेवरच…”
मुख्यमंत्री म्हणायचे की गुंड मंत्री? आता नवीन ‘गुंड’ खाते तयार करा; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल