खडसेंनी माझा सर्वाधिक छळ केला, माझं नाव घ्याल तर…- अंजली दमानिया

0
192

मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप नेते एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली आहे.

माझा लढा हा भ्रष्टाचाराविरोधात होता. कोणत्याही एका व्यक्तिविरोधात नव्हता. मी नितीन गडकरी आणि छगन भुजबळ यांच्याविरोधातही लढले. पण एकनाथ खडसे यांनी जेवढा माझा छळ केला, तेवढा कोणी केला नसेल. यापुढे कोणत्याही पत्रकार परिषदेत माझं नाव घेतलं तर याद राखा, तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा अंजली दमानिया यांनी दिला आहे.

खडसेंनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्याबद्दल अश्लील वक्तव्य केलं. वाट्टेल ते बोलले. त्यामुळे वाकोला पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात असं वक्तव्य शोभणारं नाही, असंही अंजली दमानिया म्हणाल्या.

महत्वाच्या घडामोडी-

महाराष्ट्र राज्य बंगालच्या दिशेने वाटचाल करीत आहे; निलेश राणेंची राज्य सरकारवर टीका

सनरायझर्स हैदराबादने टाॅस जिंकला; प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

अजित पवारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती खोटी- पार्थ पवार

एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत मंत्रिपद मिळेल, पण त्यांच्यासोबत कोणीच जाणार नाही- रामदास आठवले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here