आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
अहमदाबाद : आयपीएलचा 16व्या हंगामाला सूरूवात झाली असून आज आयपीएलचा पहिला सामना आज गतविजेता गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळला गेला.
गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सन प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 178 धावा केल्या. चेन्नईकडून ऋुतुराज गायकवाड याने सर्वाधिक 92 धावांची खेळी केली. ऋुतुराजने आपल्या खेळीत 4 चाैकार तर 9 षटकारांची आतीषबाजी केली. तर गायकवाड व्यतिरिक्त चेन्नईकडून मोईन अलीने 23, शिवम दुबेने 19 तर कर्णधार महेंद्रसिंह धोनी नाबाद 14 धावा केल्या. तर गुजरातकडून मोहम्मद शमी, राशिद खान आणि अल्झारी जोसेफ यांनी प्रत्येकी 2, आयपीएलमधील पदार्पणाचा सामना खेळणारा जोशूआ लिटिलनं 1 विकेट घेतली.
हे ही वाचा : “सुषमा अंधारे यांच्या तक्रारीनंतर, संजय शिरसाटांवर 48 तासांच्या आत कारवाई होणार”
दरम्यान 179 धावांचा पाठलाग करताना गुजरातने हे लक्ष्य 19.2 षटकात 5 विकेट गमावत पूर्ण केलं. गुजरातकडून सलामीवीर शुभमन गिलने सर्वाधिक 36 चेंडूत 66 धावांची विस्फोटक खेळी केली. तर विजय शंकरने 21 चेंडूत 27 धावा, वृद्धिमान साहाने 16 चेंडूत 25 धावा, राहुल तेवतियाने 14 चेंडूत नाबाद 15 धावा, तर राशिद खानने 3 चेंडूत नाबाद 10 धावा केल्या. तर चेन्नईकडून राजवर्धन हंगारगेकरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तर तुषार देशपांडे व रवींद्र जडेजाने 1 विकेट घेतली.
महत्त्वाच्या घडामोडी –
फडणवीसांची मोठी खेळी; ठाकरे गटाच्या ‘या’ आक्रमक नेत्या करणार भाजपमध्ये प्रवेश
“पंढरपूरातून सलग 6 वेळा निवडून आलेले काँग्रेसचे माजी खासदार संदीपान थोरात यांचं निधन”
गोपीनाथ मुंडेंबद्धल एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले… भाजाप मध्ये त्यांना…