मुंबई : केंद्र सरकारने 30 जूनपर्यंत लॉकडाउन वाढवण्याची घोषणा केल्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्रातही 30 जून पर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याला संबोधित करत आहेत.
पुन:च्छ हरिओम करायची वेळ आता आली आहे, असं म्हणत लॉकडाऊन हे विज्ञान असेल, तर ते उघडणं ही कला आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. हळूहळू आपण आता आपल्या आयुष्याला नव्याने सुरूवात करतोय, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, हळूहळू लॉकडाऊन शिथिल करतोय. 3 जूनपासून हातपाय हलवायला सुरूवात करू, 5 तारखेपासून काही दुकानं सुरु करु, तर 8 तारखेपासून कार्यालये सुरु करु, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
तो निर्णय अजित पवार यांचाच होता- प्रफुल्ल पटेल
…म्हणून शिवसेना आज भाजपासोबत नाही- संजय राऊत
“सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट एकटा क्रिकेटपटू”