आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मनसेचा आज 17 वा वर्धापन दिन आहे. मनसेच्या वर्धापन दिनाचा सोहळा आज पहिल्यांदाच ठाण्यात आयोजित करण्यात आला. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे मनसेच्या भव्य अशा वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर चाैफेर फटकेबाजी केली.
हे ही वाचा : …म्हणून मनसेच्या नादाला लागायचं नाही; राज ठाकरेंचा भाजपच्या ‘या’ खासदाराला इशारा
नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता असताना आपण तेथे अनेक कामे मार्गी लावली. नाशिक हे असे एकमेव शहर आहे की तेथे पुढील पन्नास वर्षे पाण्याचा प्रश्न उद्भवणार नाही. हे काम मनसेनं केलं, असं सांगतानाच मराठी चित्रपटांना चित्रपटगृह मिळत नव्हतं. मात्र, मनसेमुळे त्यांना चित्रपटगृह मिळू लागले. ‘मशिदींवरील भोंग्यांविरोधात माझ्या मनसैनिकांनी आंदोलन केले होते. तेव्हा शेकडो मनसैनिकांवर गुन्हे दाखल केले. पण त्यावेळी बजावून सांगितले होते, आमच्या वाट्याला जायचे नाही. शेवटी मुख्यमंत्री पदावरून जावे लागले ना, असं म्हणत राज ठाकरे यांनी उद्धव ठकरेंवर निशाणा साधला.
दरम्यान, भाजपला 2014 ला बहूमत मिळाले. त्या आधी भाजपनेही खस्ता खाल्या.तेव्हा कुठे आज भाजप सत्तेत आहे. आपणही सत्तेपासून दूर नाहीत. मी तुम्हाला आशा दाखवत नाही. पण मला माहीत आहे. आपल्याला महानगरपालिका जिंकायच्या आहेत. पण महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर मनसे सत्तेत असणार म्हणजे असणार’, असा निर्धार ही त्यांनी यावेळी केला.
महत्त्वाच्या घडामोडी –
आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….
संदीप देशपांडेवर ज्याने हल्ला केला, त्याला…; वर्धापन दिनी राज ठाकरेंचा धमकीवजा इशारा