मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशातील इतर राज्यांच्या वस्तू व सेवा कराची (जीएसटी) भरपाई थकली आहे. मात्र, तरीही अगदी लहान राज्यंही त्यासाठी तुमच्याप्रमाणे रडत बसलेली नाहीत, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
जीएसटीची भरपाई ही केंद्र सरकारने देणे अपेक्षित नाही. ही भरपाई जीएसटी कौन्सिलच्या फंडातून देण्यात येते. मात्र, आता या फंडातील रक्कम संपल्यामुळे जीएसटीची भरपाई देणे शक्य नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, एकट्या महाराष्ट्राची जीएसटीची रक्कम थकलेली नाही. महाराष्ट्रापेक्षा आणखी कितीतरी राज्यांचे जास्त पैसे थकलेले नाहीत. मात्र, त्या राज्यांच्या अर्थमंत्र्यांना ही बाब माहिती आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
मोदी चांगल्या मूडमध्ये नाहीत – डोनाल्ड ट्रम्प
धक्कादायक! “कोरोना विषाणू घालवण्यासाठी पुजाऱ्यानं दिला नरबळी”
निवृत्तीनंतर शिखर धवन दिसू शकतो ‘या’ भूमिकेत
आता मुंबईत अमिताभ, शाहरुखऐवजी तुझ्या घरासमोर गर्दी होणार; सोनू सूद म्हणतो…