आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आगामी कसबा-चिंचवड पोटनिवडणूकीत नवनवीन ट्विस्ट पहायला मिळत आहे. पुण्यात कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
आगामी कसबा आचि चिंचवड पोटनिवडणुकीत मनसे भाजपला पाठिंबा देणार असल्याची माहिती 2 दिवसांपूर्वी समोर आली होती. असं असताना आज महाविकासआघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भेट घेतली. मनसेनंही त्यांचं जोरदार स्वागत केलं आहे. हे स्वागत पाहून अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
हे ही वाचा : देवेंद्र फडणवीसांच्या गाैफ्यस्फोटावर, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
दरम्यान, कालच मनसेनं भाजपला पाठिंबा जाहिर केला आहे. तरीही मविआ उमेदवार रवींद्र धंगेकर आज ठरवून मनसे कार्यालयास भेट दिली. मनसे पदाधिकारी मित्रांनीही रवींद्र धंगेकर यांचं स्वागत केलं. कारण धंगेकर हे अगोदरचे मनसैनिकच आहेत. नवी पेठ येथील मनसे कार्यालयात महाविकास आघाडी उमेदवार धंगेकर यांचं स्वागत करण्यात आलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
“पवारांना विचारुन सरकार स्थापन केलं असतं तर..”; काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य
शरद पवारांविषयी बोलताना, आमदार गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली, म्हणाले…
“सर्वात मोठी बातमी! कसबा-चिंचवड पोटनिवडणूकीत मनसेचा भाजपला पाठिंबा”