आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : पुण्यातील कसबा आणि चिंचवड या विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या दोन्ही जागांवरील निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपकडून प्रयत्न केला जात आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही महाविकास अघाडीच्या नेत्यांना फोनद्वारे बिनविरोधाचं आवाहन केलंय. मात्र या पोटनिवडणूकीवरअजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचं राज ठाकरेंनी केलं आवाहन
“ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याचे काही कारण नाही. त्यांनी कोल्हापूर, पंढरपूर, देगलूर येथील पोटनिवडणूक बिनविरोध होऊ दिली नव्हती. मुंबई येथील अंधेरी पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवार दिला नाही, म्हणजे बाकीच्या सर्व निवडणुका बिनविरोध होतील हे त्यांनी डोक्यातून काढावं. शेवटी लोकशाही आहे. जनता ज्यांना निवडून द्यायचे, त्यांना निवडून देईल,” असं अजित पवार स्पष्टपणे म्हणाले आहेत. ते आज माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
दरम्यान, राज ठाकरे यांनीही पत्र लिहून कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
“वर्ष बाकी, दादांनी विचार करावा; देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना केली ‘ही’ मागणी”
सत्यजित तांबे प्रकरणावर आता बाळासाहेब थोरातांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
शुभांगी पाटील यांनी केला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश