आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
सिंधुदुर्ग : भाजपने आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथे जोरदार शक्तीप्रदर्शन केलं आहे. या कार्यक्रमला भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. यावेळी बोलताना, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नारायण राणेंनी यावेळी बोलताना, उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी, मुख्यमंत्री असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी काय केलं? असा सवालही राणेंनी यावेळी केला.
हे ही वाचा : अजित पवारांविषयी बोलताना, आमदार गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली, म्हणाले…
शिवसेना वाढायला… घडायला… आणि सत्तेत यायला… कोकणाने आधार दिला. नारायण राणेंनी आधार दिला, असं मी म्हणत नाही. पण महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यात वणवण फिरणारा कोकणी माणूसच होता. मग उद्धवा अडीच वर्षात काय केलंस रे बाबा? केवळ दोन वेळा मासे खायला आलास., अशी एकेरी टीका नारायण राणेंनी यावेळी उद्धव ठाकरेंवर केली.
दरम्यान, मी त्यांच्या प्रश्नाला उत्तर देणार नाही. जे काही द्यायचं ते मी त्याचवेळी देणार… पण हे सगळं आता मी सहन करतोय. कारण मी आता भाजपमध्ये आलोय, ही माझी अडचण आहे. भाजपात सगळी सहनशील, शांत आणि विचारसरणी मानणारे लोक आहेत. त्यामुळे मीही सगळं सहन करतोय. पण याचा कुणीही फायदा घेऊ नका, असा इशाराही राणेंनी यावेळी दिला.
महत्त्वाच्या घडामोडी –
“कोकणच्या जनतेनं ठाकरे गटाला लाथाडलं”; शिंदे गटाचा टोला
“पंढरपूरमध्ये ठाकरेंचा राजू शेट्टींना धक्का; ‘हा’ आक्रमक नेता शिवबंधन हाती बांधणार”
नागपूर निकालावरून राष्ट्रवादीचा देवेंद्र फडणवीसांना चिमटा