आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : भाजपला ठाकरे सरकारकडून मोठा धक्का मिळाला आहे. कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीचे वारसदार असलेले अद्वय हिरे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
काही दिवसांपूर्वी अद्वय हिरे यांनी विचार सभा घेऊन भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. मालेगाव शहरासह ग्रामीण भागात हिरे यांचा मोठा दबदबा आहे. नाशिक जिल्ह्यात शैक्षणिक आणि सहकार क्षेत्राच्या माध्यमातून हिरे कुटुंबाचा दांडगा जनसंपर्क आहे. याच कुटुंबातील अद्वय हिरे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. हिरे यांच्यासह जवळपास पावणे दोनशे कार्यकर्त्यांनीही शिवबंधन हाती बांधलं.
हे ही वाचा : ‘…तर भाजपसोबत युती करायला तयार आहोत’; प्रकाश आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य
दरम्यान, हिरे यांचा हा पक्षप्रवेश भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांच्यासह मोठा धक्का समजला जात आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
स्वतःच्या सोयीनुसार बोलणं ही भाजपची भूमिका; पदवीधर निवडणुकीवरून ठाकरे गटाचा निशाणा
पठाण चित्रपटासोबतच, मराठी चित्रपटांचेही शो लोवा, नाहीतर…; मनसेचा धमकीवजा इशारा