आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
कणकवली : भाजप आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना, मनसे सरचिटणीस व माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यावर टीका केली होती. यावर आता परशुराम उपरकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
नितेश राणे तुम्ही आम्हांला सल्ले देण्याची गरज नाही. तुमच्या वडिलांना आम्ही दिले होते. खाजगीत त्यांना विचारा. तुम्ही ज्या ज्या पक्षात होतात, त्या त्या वेळी तुमच्या भूमिका बदललेल्या आहेत. आम्ही बाहेर काढायला, सुरूवात केली, तर तुम्हांला फार अवघड होईल. त्यामुळे तुम्ही आमच्या भानगडीत पडू नका, असा पलटवार उपरकर यांनी यावेळी नितेश राणेंवर केला.
हे ही वाचा : “उद्धव ठाकरेंची यशस्वी खेळी; राष्ट्रवादी व भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्यांनी हाती बांधलं शिवबंधन”
मुळात आमदार असताना त्यांनी समानतेने वागण्यातबाबत शपथ घेतली होती. जनतेवर अन्याय होणार नाही, असे यात म्हटले होते. त्याचा विसर कदाचित राणेंना पडला असेल, असा टोला उपरकर यांनी यावेळी लगावला. ते मनसेच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन मनसेच्या कार्यकर्त्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न राणे करत आहेत. मात्र, मनसेचे कार्यकर्ते अशा धमक्यांना घाबरणार नाहीत. माझ्या पदाची, राणे यांनी काळजी करू नये. राज ठाकरे यांना भेटून तुम्ही आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्ही भिक घालणार नाही. राज ठाकरेंना भेटून आपण जवळचे आहोत, असं भासवण्याचाही प्रयत्न करू नका, असा टोलाही उपकरांनी यावेळी राणेंना लगावला.
महत्त्वाच्या घडामोडी –
पुण्यातील बंद बेकायदेशीर, खासदार उदयनराजे भोसलेंना अटक करा; अॅड. गुणरत्न सदावर्तेंची मागणी
शिंदे-फडणवीसांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान, म्हणाले, आता उद्धव ठाकरेंनी ठरवावं की…