आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आगामी मुंबई महापालिकेसाठी मनसेनं जोरदार कंबर कसली असून त्यासाठी जोरदार तयारी पक्षाकडून सूरू आहे. अशातच तीन दिवसांपूर्वी मुंबईतील नेस्को सेंटर येथे मनसेचा आयोजित गटप्रमुखांच्या मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चाैफेर फटकेबाजी केली. यावेळी बोलताना राज यांनी उद्धव ठाकरेंची नक्कल केली.
मी बाहेर पडलो, तर काही जणांच्या पोटात गोळा आला, असं म्हणत नक्कल करणाऱ्या राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंनी थेट प्रत्युत्तर दिलंय.
हे ही वाचा : “ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के; ‘या’ मोठ्या नेत्यानं ठाकरेंची साथ सोडत केला शिंदे गटात प्रवेश”
महाराष्ट्राची ताकद म्हणजे ही एकवटते आहे. मला आनंद आहे. मी बोलू शकतो. मी रस्त्यावर उतरलो तर काहीही करू शकतो., असा पलटवार उद्धव ठाकरेंनी यावेळी केला. वांद्रे येथील लहुजी साळवे यांच्या जयंती महोत्सवात उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली. यावेळी ते बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वेगळी वाट दाखविली. शिवशक्ती, भीमशक्ती आणि आता लहू शक्ती एकत्र येतेय. मला शिवाजी पार्कवर झाला तसा मेळावा लवकर घ्यायचा आहे., असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच या तिन्ही शक्तींचा कर्तबगार महिला किंवा पुरुष मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा आहे. हे स्वप्न, स्वप्न न ठेवता सत्यात उतरवायचं असेल तर तुम्हाला सोबत घेऊन ही विचारांची मशाल वाड्या, वस्त्यात घेऊन जावं लागेल., असं आवाहनही उद्धव ठाकरेंनी यावेळी केलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
“जितेंद्र आव्हाडांना विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकविण्यात, मनसेच्या मोठ्या नेत्याचा हात?”
“ताराराणी चाैकात मनसेचं जंगी स्वागत; राज ठाकरे यांना पाहण्यासाठी कोल्हापूरकरांची प्रचंड गर्दी”
एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटाला मोठा धक्का; ‘या’ मोठ्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश